Pune : शिक्षकेतर कर्मचारी बुधवारपासून कामावर

आठवड्याभरानंतर कामकाज सुरळीत, शासनाला १० मार्च पर्यंतचा अल्टीमेटम
pune
pune Sakal

पुणे : राज्यभरातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बुधवारी कामावर परतले. मागील आठवडाभरापासून विविध मागण्यांसाठी त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. बारावीच्या परीक्षा आणि सरकारच्या सकारात्मक प्रतिसादानंतर कर्मचऱ्यांनी १० मार्च पर्यंत आंदोलन स्थगित केले आहे.

राज्यातील अकृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी प्रलंबित मागील वर्षभरापासून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आदी मागण्यांसाठी गुरूवार (ता.१६) पासून त्यांनी कामबंद आंदोलनाच हत्यार उपसले होत.

यामुळे मात्र विद्यार्थी आणि शिक्षकांची मोठी हेळसांड झाली होती. तसेच बारावी बोर्डाच्या परीक्षाही प्रभावित होत होत्या.

याचा सर्वाधिक फटका शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बसत होता. विद्यार्थ्यांचे हीत लक्ष्यात घेता आता तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले असून, सरकारला ११ मार्चचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांची परवड लक्षात घेता. तसेच मंत्रीमंडळ बैठकीच्या इतीवृत्तातील सकारात्मक बाब लक्षात घेता आम्ही आंदोलन तात्पुर्ते स्थगित केल आहे. जर शासनाने १० मार्च पर्यंत अध्यादेश काढला नाही. तर ११ मार्चपासून आम्ही पुन्हा एकदा बेमुदत संप पुकारणार आहोत.

- डॉ. सुनील धिवार, उपाध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com