पुणेकरांनो, खबरदारी घ्या! पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या घरात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 March 2021

रविवारी ६ हजार ७४३ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९८४ जण पॉझिटिव्ह आले असून, शहरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ६८९ इतकी झाली आहे.

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, रविवारी लागण झालेल्यांची संख्या एक हजाराच्याजवळ पोचली आहे. आज ९८४ नवे रुग्ण सापडेल आहेत. रविवारी ६ हजार ७४३ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९८४ जण पॉझिटिव्ह आले असून, शहरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ६८९ इतकी झाली आहे. दिवसभरात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यापैकी एकजण शहराबाहेरील आहे. ३४१ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. कोरोना उपचार केंद्र, जम्बो रुग्णालय सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मास्क न लावता, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन होत नसल्याने कारवाईदेखील कडक करण्यात आलेली आहे. मात्र, कोरोना रुग्ण संख्या वाढीवर अद्याप ब्रेक लागलेला नाही.

तारीख रुग्ण संख्या
१ मार्च ४८८
२ मार्च ६८८
३ मार्च ८५३
४ मार्च ९०४
५ मार्च ८३०
६ मार्च ९६३
७ मार्च ९८४
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune the number of corona victims is one thousand

Tags
टॉपिकस
Topic Tags: