कोरोनामुक्तांच्या रुग्णसंख्येत पुणे ठरला देशात नंबर वन जिल्हा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

पुणे जिल्ह्यात काल अखेरपर्यंत 1 लाख 84 हजार 649 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.काल दिवसभरात जिल्ह्यात 3 हजार 889 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.एकूण रुग्णांची संख्या आता दोन लाख31हजार196वर पोहोचली आहे. 

पुणे - देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या पुणे जिल्ह्याने काल कोरोनामुक्त रुग्णसंख्येतही देशात अव्वल स्थान पटकावले आहे. पुणे जिल्ह्यात काल (ता.15) अखेरपर्यंत 1 लाख 84 हजार 649 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल दिवसभरात जिल्ह्यात 3 हजार 889 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या आता दोन लाख 31 हजार 196 वर पोहोचली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कालच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 1 हजार 691 जण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवडमध्ये 997, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 855, नगरपालिका क्षेत्रातील 183 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 163 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 43 जण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवडमधील 10, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 11, नगरपालिका क्षेत्रातील 5 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 1 लाख 2 हजार 95 जणांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमधील 54 हजार 779, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 18 हजार 463, नगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 636 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 3 हजार 676 रुग्ण कोरोनातून पुर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत 5 हजार 292 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 184 रुग्ण आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune number one district in the country the number of corona discharge patients