पुणे : रेरा'चे उल्लंघन करून दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका

नोंदणी उपमहानिरीक्षकांकडून कारवाईचे आदेश
Rera Act
Rera Actsakal

पुणे : रेरा कायद्याचे उल्लंघन करून बिनबोभाट दस्त नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयातील ४४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नोंदणी महानिरीक्षकांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यापैकी ११ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यांची खातेनिहाय विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून प्राप्त माहितीनुसार,

रेरा कायद्याचे उल्लंघन करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील काही अधिकारी- कर्मचारी दस्त नोंदणी करीत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ३ या कार्यालयासोबतच पुणे शहरातील इतर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची कार्यवाही कशी पार पाडली जाते, याबाबत प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी पथक नेमण्यात आले होते. या तपासणीमध्ये ४४ अधिकारी, कर्मचारी यांनी १० हजार ५६१ दस्तऐवजांची नोंदणी केल्याचे आढळून आले आहे. त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला. त्यावर राज्य सरकारने तीन मार्च रोजी संबंधित दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चार एप्रिलला ७ आणि त्यापूर्वी ४ कर्मचारी असे एकूण ११ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

इतर ९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करून बदलीचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला आहे. अन्य ९ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर, उर्वरित ८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांमध्ये अन्य ७ कनिष्ठ लिपीक असून, त्यांच्याबाबत सह जिल्हा निबंधक वर्ग- १ पुणे शहर यांच्या स्तरावर कार्यवाही करण्याचे आदेश नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) गोविंद कराड यांनी दिले आहेत.

नोंदणी उपमहानिरीक्षकांकडून कारवाईचे आदेश

- दुय्यम दुय्यम निबंधक कार्यालयातील भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश

- ११ अधिकारी कर्मचारी निलंबित

- ४४ अधिकारी- कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

- नियमबाह्य १० हजार ५६१ दस्तऐवजांची नोंदणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com