Liver Donation - बहिण भावासाठी करणार यकृत दान,मात्र प्रत्यारोपण खर्चासाठी सुमारे एकविस लाख जमवण्यासाठी कुटुंबाची धडपड

जुनी सांगवी येथील प्रियदर्शनी नगर येथे संतोष पाटील हे पत्नी व दोन मुलांसह गेली २० वर्षांपासून वास्तव्यास आहेत.त्यांचा मुलगा राहुल संतोष पाटील वय १७ याचे यकृत निकामी झाले आहे.
Liver Donation
Liver Donationsakal

Liver Donation, जुनी सांगवी- भाऊ बहिणीच नातं म्हणजे त्यातील जिव्हाळा प्रेम हे मातृत्व व दायित्व यांच्या पलिकडचे.भाऊ माझा पाठीराखा हे समाज मनात आपण पाहातो.

भाऊ बहिणीचे एकमेकांवर असलेले प्रेम यातच मोठी बहीण असल्यावर लहान भावास अगदी लाडाने त्याची काळजी घेत स्वतः भाऊ बनून त्याची पाठीराखी बनते.हा प्रत्यय येतोय सांगवीत राहणा-या राहुल व नंदीनीचा.आजारी असलेल्या भावासाठी ती भावाला यकृत दान करून नंदिनी भावाची पाठीराखी बनणार आहे.

Liver Donation
Mumbai : पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे छापे

जुनी सांगवी येथील प्रियदर्शनी नगर येथे संतोष पाटील हे पत्नी व दोन मुलांसह गेली २० वर्षांपासून वास्तव्यास आहेत.

त्यांचा मुलगा राहुल संतोष पाटील वय १७ याचे यकृत निकामी झाले आहे. संतोष पाटील हे मुळचे जळगाव अमळनेर तालुक्यातील करणखेडे या गावचे आहेत.गावाला स्वतःची शेती नसल्याने कामधंदा व मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात आले ते एका कंपनीत वाचमन म्हणून काम करतात.

Liver Donation
Mumbai : मनपा कर्मचारी-अधिकाऱ्यांवरील ईडी चौकशी थांबवा! म्युनिसिपल मजदूर संघाची मागणी

तर राहुलची आई घर काम धुणी भांडी करून घराला हातभार लावतात.कष्ट करून समाधानाने चाललेलं कुटुंब दहावीत शिकत असलेल्या राहुल या मुलाचे यकृत निकामी झाल्याचे समजल्याने मानसिक आघाताने कोलमडले. या कुटुंबावर जनू आभाळ कोसळले नवी मुंबईच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये तपासणी अंती ही बाब निदर्शनास आली.

यकृत प्रत्यारोपण तातडीने न केल्यास राहुलच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी सूचनाही डॉक्टरांनी केली. आईने मुलासाठी यकृत देण्याची तयारी दर्शवली मात्र मॅच झाले नाही. त्यामुळे यकृतदान करायला पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेली राहुलची मोठी बहीण नंदिनी तयार झाली घरातीलच यकृत दाता मिळाला असला तरी प्रत्यारोपणासाठी होणारा २१ लाख रुपये खर्च उभारायचा कसा हा प्रश्न कुटुंबासमोर आहे.

Liver Donation
Pune Police: पोलिस आयुक्त रितेश कुमार अ‍ॅक्टिव मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षिततेसाठी उचललं पाऊल

मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रधानमंत्री सहाय्यता निधी यासाठी त्यांनी प्रस्ताव पाठवलेला असून त्यातून सहा लाख रुपये उभे राहणार आहेत मात्र उर्वरित रक्कम कशी उभारायची ही विवंचना कुटुंबा समोर आहे. प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या खर्चासाठी दानशुरांनी पुढे येऊन राहूलला जीवदान द्यावे असे आव्हान कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

राहुलच्या यकृत प्रत्यारोपणासाठी २१ लाखांचा खर्च आहे.त्यातच आमची कागदपत्रे गावची आहेत.भावाला जिवनदान मिळावे यासाठी मी माझे यकृत दान करणार आहे.मला या समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी मदत करावी.नंदिनी पाटील संपर्क -८७६६६९५०२९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com