
पुणे : मुठा नदीमधील पाण्याचा विसर्ग वाढविल्याने महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाकडून सतर्कतेच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ३५० कर्मचारी, बोट, यंत्रसामग्री ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यापासून पूरस्थितीच्यावेळी त्यांची राहण्याचीही व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे.