पुणे : जबरदस्तीने तरुणास लुटणाऱ्यांपैकी एकास अटक

4thief_13.jpg
4thief_13.jpg

पुणे :  रस्त्याने जाणाऱ्या तरुणास अडवून त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल असा 21 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना धायरी येथील धायरेश्‍वर मंदीराजवळ शुक्रवारी पहाटे दोन वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. 

कृष्णा भगवान गोरेकर (वय 20, रा.गोविंदानगर, नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रमेश जाधव (वय 20, रा.बनकर वस्ती, मोशी) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शुक्रवारी पहाटे दोन वाजता धायरी येथील धायरेश्‍वर मंदिर परिसरातून जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दोघांनी फिर्यादी यांना अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीने मोबाईल व रोख रक्कम असा 21 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींचा शोध घेत गोरेकर यास अटक केली. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक यु.ए.महांगडे करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com