
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने २२ जानेवारी ४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ४ हजार २७९ शालाबाह्य मुले आढळून आली आहेत. यामध्ये २ हजार ५० मुले हे सहा वर्षापेक्षा कमी वयाची आहेत.
पुणे : शहर व जिल्ह्यातील शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि या मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी आता बालरक्षक पुढाकार घेणार आहेत. यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ‘एक गाव, एक बालरक्षक़’ ही अनोखी मोहीम सुरू
करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत दोन हजार ८९ बालरक्षक पुढे आले आहेत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (डीआयईटी) शुक्रवारी (ता.५) या बालरक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली.
पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ४ हजार ८१ शाळांसाठी हे बालरक्षक काम करणार आहेत. शालाबाह्य मुलांचा शोध घेणे, या मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि शाळेत दाखल केलेल्या या शालाबाह्य मुलांना शाळेत टिकवून ठेवणे आदी कामे हे बालरक्षक करणार असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. शोभा खंदारे यांनी सांगितले. ही कार्यशाळा ऑनलाईन घेण्यात आली. या कार्यशाळेत प्राचार्या डॉ. खंदारे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता दीपाली जोगदंडे, उपशिक्षिका रोहिणी लोखंडे, सुनीता काटम मेळघाट येथील शिक्षक विनोद राठोड आदींनी बालरक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, समता विभागाचे प्रमुख महेश शेंडकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे आदी उपस्थित होते यासाठी निवड करण्यात आलेल्या एकूण शाळांमध्ये पुणे शहरातील ३३६, पिंपरी चिंचवडमधील ५१ आणि जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६९४ शाळांचा समावेश आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने २२ जानेवारी ४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ४ हजार २७९ शालाबाह्य मुले आढळून आली आहेत. यामध्ये २ हजार ५० मुले हे सहा वर्षापेक्षा कमी वयाची आहेत पुणे शहरातील औंध, बिबवेवाडी, हडपसर, येरवडा, पुणे शहर मध्य तर, पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी आणि पिंपरी आदी भागात हे बालरक्षक काम करणार आहेत.
क्षेत्रनिहाय शाळा बालरक्षक
क्षेत्र शाळा बालरक्षक
पुणे शहर ३३६ २९०
पिंपरी चिंचवड ५१ ५१
जल्हा परिषद क्षेत्र (ग्रामीण) ३६९४ १७४८