येरवडा कारागृह परिसरात होणार ‘पुणे करार स्मारक’

येरवडा कारागृह परिसरात 
होणार ‘पुणे करार स्मारक’
Published on: 

पुणे, ता. ३१ ः देशाच्या सामाजिक, राजकीय इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना म्हणून नोंद असलेल्या ‘पुणे करारा’च्या ऐतिहासिक स्थळाचे जतन, संवर्धन करण्यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह परिसरात ‘पुणे करार स्मारक’ उभारण्यात येणार आहे. राज्य सरकार, महापालिकेतर्फे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सर्व पक्षनेत्यांच्या झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

स्थायी समितीचे सदस्य सुहास टिंगरे यांनी याबाबत प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. या स्मारकाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासह ऐतिहासिक माहिती संग्रहालय विकसित करण्याची मागणी प्रस्तावाद्वारे करण्यात आली. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्व पक्षनेत्यांची बैठक झाली. त्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत ‘पुणे करार स्मारका’स मंजुरी देण्यात आली.
ब्रिटिश सरकारने १९३२ मध्ये जाहीर केलेल्या ‘कम्युनल ॲवॉर्ड’च्या पार्श्वभूमीवर वंचित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या प्रश्नावर देशभर चर्चा सुरू झाली. त्यानंतर महात्मा गांधी यांनी येरवडा कारागृहात उपोषण सुरू केले. डॉ. आंबेडकर आणि अन्य नेत्यांशी झालेल्या चर्चेतून २४ सप्टेंबर १९३२ रोजी ऐतिहासिक पुणे करार अस्तित्वात आला. तर २०३२ मध्ये या करारास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान, पुणे कराराचा इतिहास जपण्यासाठी येरवडा कारागृहातील गांधी यार्ड आणि ऐतिहासिक आंब्याच्या झाडाचे जतन करणे गरजेचे असून, केंद्रीय डिजिटल नोंदीतही याचे महत्त्व नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.