

Pune
esakal
पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे गुरुवारी (ता. ९) पुण्यात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्यांच्या मुक्कामासाठी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिर सज्ज झाली असून, मंडप उभारणी, सजावट, विद्युत रोषणाईसह वारकऱ्यांच्या निवास, भोजन आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे.