esakal | पाषाण : 'एनसीएल कॉलनी'तील 11 चंदनाची झाडे चोरीला
sakal

बोलून बातमी शोधा

thief

पाषाण : 'एनसीएल कॉलनी'तील 11 चंदनाची झाडे चोरीला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पाषाण (pashan) येथील राष्ट्रीय रासायनीक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारातील कॉलनीमधील 10 ते 11 चंदनाची झाडे चोरट्यांनी चोरुन नेली. हि घटना 21 ऑगस्ट रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पराग चिटणवीस (वय 53, रा. पाषाण) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिटणवीस हे "एनसीएल'मध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एनसीएल कॉलनीच्या आवारात विविध प्रकारची झाडे असून त्यामध्ये चंदनाच्या झाडांचाही समावेश आहे.

दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी कॉलनीच्या आवारात असलेली चंदनाची 10 झाडे तसेच साक्षीदार राजीव फडतरे यांच्या घराशेजारी असणारे एक चंदनाचे झाडे असे एकूण साडे पाच हजार रुपये किंमतीची 11 झाडे चोरट्यांनी चोरुन नेली. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार इरफान मोमीन करीत आहेत.

loading image
go to top