पुणे : शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे (Pune Rain) विविध ठिकाणी दुर्घटनांची मालिका सुरु आहे. पाषाण भागातही एक दुर्घटना घडलीये. निशिगंध इमारतीसमोर एक जुने झाड अचानक कोसळले आणि त्याखाली एक विद्यार्थिनी अडकली, तसेच एक चारचाकी आणि दुचाकी वाहनही झाडाखाली दबले गेले.