Pedestrian Signals : पुणे : वित्तीय समितीत अडकले पादचारी सिग्नल

पुणे महापालिकेतर्फे पादचारी दिनाची जय्यत तयारी सुरू असताना वर्दळीच्या रस्त्यावर दुसरीकडे ५१ ठिकाणी पादचारी सिग्नल बसविण्यासाठीचा प्रस्ताव वित्तीय समितीमध्ये अडकून पडला आहे.
Signal
SignalSakal
Summary

पुणे महापालिकेतर्फे पादचारी दिनाची जय्यत तयारी सुरू असताना वर्दळीच्या रस्त्यावर दुसरीकडे ५१ ठिकाणी पादचारी सिग्नल बसविण्यासाठीचा प्रस्ताव वित्तीय समितीमध्ये अडकून पडला आहे.

पुणे - पुणे महापालिकेतर्फे पादचारी दिनाची जय्यत तयारी सुरू असताना वर्दळीच्या रस्त्यावर दुसरीकडे ५१ ठिकाणी पादचारी सिग्नल बसविण्यासाठीचा प्रस्ताव वित्तीय समितीमध्ये अडकून पडला आहे. त्यामुळे ३९ लाख रुपयांची निविदा अद्यापही निघालेली नाही.

पुण्यातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणून स्मार्ट सिटी मार्फत ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्याचे काम सध्या सुरू असून मार्च अखेर पर्यंत १२५ सिग्नल आणि नियंत्रण कक्ष तयार होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीनुसार सिग्नलची वेळ बदलून वाहतूक नियमन केले जाणार आहे.

वाहनासाठी सुधारणा करताना दुसरीकडे नागरिकांनी चालण्यासाठी प्राधान्य द्यावे म्हणून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा केला जात आहे. यंदा २१ रस्त्यांवर पादचारी दिन साजरा केला जाणार असून, त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पथ विभागाने विद्युत विभागाला चौकांची यादी देऊन त्या ठिकाणी पादचारी सिग्नल बसवावेत अशा सूचना केल्या होत्या. तसेच अतिरिक्त आयुक्तांकडूनही त्याबाबत सूचना दिल्या.

त्यानुसार विद्युत विभागाने ५१ ठिकाणी पादचारी सिग्नल बसविण्याच्या कामासाठी ३९ लाख रुपयांची निविदा काढली पण त्यास अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया न झाल्याने पादचारी दिन आला तरी सिग्नल बसलेले नाहीत.

याबाबत आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘पादचारी सिग्नल बसविण्यासाठी वित्तीय समितीमध्ये प्रस्तावास मान्यता दिली जाईल. तसेच आयटीएमएस प्रकल्प मार्च मध्ये पूर्ण होणार असल्याचे स्मार्ट सिटीने कळविले आहे.’

या चौकात बसणार पादचारी सिग्नल

  • जंगली महाराज रस्ता - स. गो. बर्वे चौक, छत्रपती संभाजी महाराज उद्यान प्रवेशद्वार, जंगली महाराज मंदिर

  • गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता)- बीएमसीसी चौक, वैशाली हॉटेल, शिवाजीनगर पोलिस ठाणे,

  • सेनापती बापट रस्ता -सिंबायोसिस महाविद्यालय प्रवेशद्वार, रत्ना रुग्णालय,

  • राजभवन रस्ता - बालकल्याण संस्था, केंद्रीय विद्यालय, शिवाजी स्कूल औंध गावठाण.

  • लाल बहादूर रस्ता - काका हलवाई समोर,

  • बाजीराव रस्ता - महाराणा प्रताप उद्यान, लेले दवाखाना, फुटका बुरूज, शनिवार वाडा, नूमवी शाळेसमोर, गरवारे बालभवन, सारसबाग.

  • पेशवे पथ - आंबिल ओढा कॉलनी,

  • सोलापूर रस्ता - गाडीतळ हडपसर, पुणे-सोलापूर रस्ता मगर रुग्णालय, रवी दर्शन चौक, १५ नंबर सिग्नल, मगरपट्टा मुख्य प्रवेशद्वार, सीझन मॉल सिग्नल, ताडीगुत्ता चौक

  • पाषाण रस्ता-लाॅयला स्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल

  • कर्वे रस्ता- खंडोजी बाबा चौक, शेलार मामा चौक, पूना हॉस्पिटल चौक, गोखले मामा चौक, स्वातंत्र्य चौक, अभिनव चौक, पौड फाटा चौक, हुतात्मा राजगुरू चौक, कर्वे पुतळा चौक, कोकण एक्स्प्रेस चौक, वनदेवी माता मंदिर चौक, कर्वेनगर पूल चौक, खिलारे पाटील रस्ता, पाडळे पॅलेस चौक,

  • एनडीए रस्ता - रमेशभाऊ वांजळे चौक, आंबेडकर चौक, गणपती माथा चौक, शिंदे पूल चौक

  • पौड रस्ता - पौड फाटा, केळेवाडी चौक, मोरे विद्यालय चौक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com