

General State of Pune Subways
Sakal
पुणे : शहरातील मोठे रस्ते, चौक सुरक्षितपणे पादचाऱ्यांनी ओलांडावेत, म्हणून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी भुयारी मार्ग बांधले. पण या भुयारी पादचारी मार्गांची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित केली जात नाही. भुयारी मार्गात पडलेला कचरा, अपुऱ्या प्रकाशामुळे अंधार, तेथे असणारे तळीरामांचे अड्डे यामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. काही भुयारी मार्ग तर वर्षानुवर्षे बंद असून, त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे पुणे महापालिका प्रशासन कधी लक्ष देणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पुणे शहरासह उपनगरांतील भुयारी पादचारी मार्गांची ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी पाहणी केली. यातून भयाण वास्तव समोर आले आहे.