esakal | Coronavirus : पुण्यातील पेठा केल्या ‘सील’
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

अत्यावश्‍यक सेवा सुरु
सील केलेल्या भागांत संचारबंदी असली तरी अत्यावश्‍यक सेवांच्या विशेषत: किरणा साहित्य, भाजीपाला दुकानांत नागरिकांची आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची रस्त्यावर वर्दळ होती. शेतकऱ्यांची आणि मार्केटयार्डातील वाहने या भागात आली परंतु, या भागातील व्यावसायिक आणि त्यांची वाहने मात्र अन्य परिसरात सोडण्यात आली नाहीत. येत्या १४ एप्रिलपर्यंत अशाच प्रकारे अत्यावश्‍यक सेवा सुरू राहिल, असे पोलिसांनी सांगितले.

भुसार बाजारात गर्दी
काही परिसरात संचारबंदी लागू झाल्याने लोकांत उगाचच भीती पसरली असून, संचारबंदी वाढेल या चिंतेने लोकांनी बुधवारी पुन्हा मार्केटयार्ड आणि भाजी मंडईत प्रचंड गर्दी केली. सकाळी अकराच्या सुमारास भुसार बाजारात लोकांची आणि वाहनांची वर्दळ दिसून आली. त्यामुळे या परिसरातील पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवताना अडचणी आल्याचेही सांगण्यात आले.

Coronavirus : पुण्यातील पेठा केल्या ‘सील’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाला रोखण्याकरिता शहरातील पेठा ‘सील’ करण्याबरोबरच गल्लीबोळात बॅरिकेड आणि बांबू टाकून बहुतांशी भागांचे प्रवेश पोलिसांनी रोखले. परिणामी वाहनेच काय तर पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडणे अशक्‍य झाल्याने ‘सील’ केलेला भाग खऱ्याअर्थाने ‘ब्लॉक’ झाला. अशा परिस्थितीतही अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोक सकाळी दहा ते बारापर्यंत रस्त्यांवर दिसत होते. ही वेळ संपताच पोलिसांनी मात्र लाठी उगारण्यास सुरुवात केल्याने काही मिनिटांतच रस्ते निर्मनुष्य झाले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुसरीकडे, सायंकाळी पाच साडेपाचनंतर लोक पुन्हा घराबाहेर येणार नाहीत, यासाठी पोलिस गल्लीबोळातही फिरून गस्त घालत होते. त्यामुळे पोलिसांची नजर शचुकवून रस्त्यांवर येण्याच्या बेतात असलेल्यांनी घराबाहेर पडण्याचे धाडस दाखविले नाही. अगदी हॉस्पिटल आणि मेडिकलमध्ये जाणाऱ्यांनाही पोलिसांनी हटकल्याने संचारबंदीचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा पोलिस यंत्रणेने केला. 

शहरातील काही भागांतच कोरोनाचे रुग्ण आणि संशयित वाढत असल्याने सर्व पेठांसह कोंढवा आणि महर्षीनगर ते ‘आरटीओ’पर्यंतचा रस्ता सील केला आहे. त्यानंतर या भागात नव्याने संचारबंदी लागू करीत अत्यावश्‍यक कामांसाठी लोकांना सकाळी दोन तासांचा वेळ पोलिसांनी दिला आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत विविध चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख रस्ते, चौक आणि गल्लीबोळ बंद करण्यात आले.  सर्व ठिकाणी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना नेमून लोक रस्त्यांवर येणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली. खडकी बाजार, लोहगाव, कोंढवा अादी परिसरातही रस्त्यांवर शुकशुकाट होता. लोहगावकरांनी तीन दिवस घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आाहे. 

loading image
go to top