
पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुण्यात मध्यरात्रीपासून पेट्रोलने शंभरी पार केली आहे.
पुणे : इंधन दराचा भडका देशभरात चिंतेचा विषय ठरला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याविषयावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, केंद्राचा टॅक्स जास्त की राज्याचा टॅक्स जास्त हा वाद चघळण्यातच राजकीय नेते गर्क असल्याचं दिसतंय. या सगळ्या सामान्यांना दिलासा मिळण्याची चिन्हं दिसेनाशी झाली आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुण्यात मध्यरात्रीपासून पेट्रोलने शंभरी पार केली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्याासाठी येथे क्लिक करा
दिल्लीतील दर (प्रतिलिटर रुपयांत)
पुण्यातील दर (प्रतिलिटर रुपयांत)
पुण्यात कोरोना रुग्ण वाढले, ऑक्सिजन बेड सज्ज
कोण काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी एका सार्वजनिक सभेत पेट्रोल-डिझेल दरवाढीला आधीचे काँग्रेस सरकार जबाबदार असल्याचं वक्त्व्य केलं होतं. काँग्रेसने पर्यायी इंधनासाठी कोणतेही काम केले नाही. त्यामुळं इंधनासाठीचं परावलंबित्व कमी झालं नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणवर टीका झाली. काँग्रेसनेही या वक्तव्याचा समाचार घेतला होता. काँग्रेसच्या काळात तेल साठे शोधून काढण्यात आले. बॉम्बे हाय हे त्याचे उदाहरण आहे. असं सांगत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.