Pune : पेट परीक्षेसाठी ७२ टक्के उपस्थिती

नगर, नाशिक आणि पुण्यात पार पडली पीएचडीची प्रवेशपूर्व परीक्षा
PHD
PHDsakal

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली असून, ७२ टक्के उमेदवारांनी परीक्षेत उपस्थिती दर्शवली आहे. रविवारी नगर, नाशिक, पुणे आणि बारामती शहरातील केंद्रांवर दोन सत्रात ही परीक्षा पार पडली.

विद्यापीठाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठीचीही ही प्रवेश परीक्षा ३३ केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. रविवारी सकाळच्या सत्रात साडेदहा ते साडेबारा व दुपारच्या सत्रात अडीच ते साडेचार या दोन सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण १२ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी नऊ हजार १८२ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली आहे. सर्व केंद्रांवर सुरळीतपणे आणि विनाअडचण परीक्षा पार पडल्याचे कुलसचिवांनी सांगितले आहे.

पेट बद्दल सर्वकाही...

१) पीएच.डी. प्रवेशाकरिता पेट परीक्षा अनिवार्य आहे का ?

- होय.

२) परीक्षेत सूट कोणास मिळते ?

- जे विद्यार्थी सेट किंवा नेट परीक्षा संबंधित विषयात पात्र असतील, तर त्यांना पेट परीक्षेतून सूट मिळते. मात्र त्यांना सूट मिळण्यासाठी अर्ज मात्र करावा लागतो.

३) प्रत्येक विद्यापीठाची पेट परीक्षा स्वतंत्र असते का ?

- होय, प्रत्येक विद्यापीठ पीएच डी प्रवेशासाठी स्वतंत्रपणे पेट परीक्षा घेते

४) पेट परीक्षेत किती पेपर असतात ?

- युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पेट मध्ये दोन पेपर असतात. अ) संशोधन पद्धतीवर आधारित पेपर, ब) विषयाशी निगडित पेपर

५) पीएच. डी. कशासाठी ?

- युजीसीच्या धोरणानुसार २०२१ पासून विद्यापीठात सहायक प्राध्यापक होण्यासाठी सेट नेट सोबतच पीएच.डी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच नोकरीत असणाऱ्या प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी आवश्यक असणार आहे.

६) पीएच.डी करिता फेलोशिप आहे का?

- पूर्णवेळ संशोधन कार्य करण्यासाठी पीएच.डी पदवीसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप(जेआरएफ), जे.आर.डी. टाटा फेलोशिप, राजीव गांधी फेलोशिप मिळते तसेच बार्टी व सारथी संस्थेकडूनही पीएच.डी साठी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com