

PCMC Election 2025
sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी ४१ प्रभागांमधून मंगळवारी दिवसभरात दोन हजार २९८; तर एकूण तब्बल तीन हजार ४१ अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी (ता. ३१) अर्जांची छाननी होणार आहे. सर्वच प्रभागांत मुख्य राजकीय पक्षांच्या अनेक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे छाननी झाल्यानंतर ज्यांचे अर्ज वैध झाले आहेत, त्यांना अर्ज माघारी घेण्यासाठी अधिकृत उमेदवार व नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा बंडखोर उमेदवारांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागणार आहे.