पुणे, पिंपरीकरांना खूशखबर, सोमवारपासून PMPच्या 1150 बस धावणार

PMP Bus
PMP BusSakal
Updated on

पुणे शहर, उपनगर आणि जिल्ह्यातील प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने पीएमपीच्या ताफ्यात सोमवारपासून १५० बस दाखल होणार आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांत आता सुमारे ११५० बस रोज धावतील. पीएमपीच्या ताफ्यात सध्या १ हजार बस धावत आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार पीएमपीची वाहतूक ५० टक्के क्षमतेने सुरू आहे. मात्र, जनजीवन सुरळीत होत असताना, प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत बसची संख्या अपुरी पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांशी विचारविनिमय करून पीएमपीने १५० बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्या बाबतच्या आदेशावर पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नुकतीच स्वाक्षरी केली.

पीएमपीने दोन्ही शहरांसाठी बससेवा सुरू केली असली तरी, बीआरटी मार्गावरील अद्याप पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे पुढील काळात त्या वाहतुकीवरही लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असे पीएमपीचे म्हणणे आहे. मात्र, बस संख्या वाढल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल, त्या पद्धतीनुसार पुढील नियोजन करण्यात येईल, असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी स्पष्ट केले. पीएमपीमध्ये सध्या रोज चार लाख प्रवासी प्रवास करीत असून सुमारे ६५ लाखांचे उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा होत आहे.

PMP Bus
महाराष्ट्रात गेलो की ठाकरे सरकारचे वाभाडे काढणार - राणे

पुणे दर्शन अजूनही बंदच

पुणे आणि पिंपरी पिंपरी चिंचवड शहरांची माहिती पर्यटकांना व्हावी, यासाठी या उद्देशाने सुरू करण्यात आलेली पुणे आणि पिंपरी चिंवचड दर्शन बससेवा अद्याप बंद आहे. त्याबाबत आदेश नसल्यामुळे ही सेवा सुरू करता आलेली नाही, असे पीएमपीचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी २३ मार्चपासून ही सेवा बंद करण्यात आली आहे. दोन्ही शहरांतील पर्यटनस्थळे बंद आहेत. तसेच शहर पाहण्यासाठी जवळजवळ पूर्ण दिवस लागतो. सध्याचे निर्बंध लक्षात घेऊन ही बससेवा बंद करण्यात आली आहे, असे झेंडे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Property Tax
aaple sarkar seva kendra
Hooch Crackdown: Loni Kalbhor Police Bust Hazardous Chemical Toddy Laboratory
Political Uproar: Supriya Sule Demands Forced Leave for Pune Police Commissioner Over Crime Surge
Marathi News Esakal
www.esakal.com