
पिंपरी, ता. १ ः केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेपाठोपाठ महापालिकेच्या शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) शहरातील रस्ते विकसित केले जात आहेत. त्यामध्ये मुख्य मार्ग, सेवारस्ता, वाहनतळ, सायकल ट्रॅक, पदपथ असे नियोजन आहे. बहुतांश रस्त्यांची कामे झाली असून, काही कामे अद्याप सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा कायापालट होताना दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या पर्यायाने वाहनांची संख्या वाढत आहे. परिणामी सर्वच रस्त्यांवर रहदारी वाढत असून, रस्ते मोठे असूनही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. पार्किंगचा प्रश्नही गंभीर होत आहे.