
Green Light for Development: Draft DP of Pune's 9 Merged Villages Out for Public Scrutiny.
Sakal
पुणे : पुणे शहराच्या हद्दीलगतच्या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी म्हणून २०१७ मध्ये ९ गावे महापालिकेत समाविष्ट केली होती. त्यांचा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारने मंजूर करून तो आज प्रसिद्ध केला आहे. त्यावर आता नागरिकांना हरकती सूचना नोंदविण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या प्रारूप विकास आराखड्यात एकूण १७५ आरक्षणाचा समावेश आहे.