

ai image
esakal
Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या दवाखान्यांतील बाह्यरुग्ण विभागातून कफ सिरप हवे आहे तर बाटलीत घेऊन जा. आयोडेक्स मलम हवा आहे तर कागदात न्या किंवा घरून डबी घेऊन या असे चित्र दवाखान्यांत दररोज दिसून येते. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाने (एफडीए) दोन दवाखान्यांवर धाड टाकत त्या प्रक्रियेवरच आक्षेप घेतला. रुग्णांना कफ सिरप व मलम औषधांचे सुरक्षित वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.