

PMC Election 2025
sakal
पुणे : भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तासापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास पसंती दिली. याबरोबरच काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाराज उमेदवारांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व प्रभागांसाठी उमेदवार असतानाही ऐनवेळी प्रवेश करणाऱ्या अन्य पक्षांमधील इच्छुकांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने भाजपसमोर तगडे आव्हान उभे केल्याचे सध्याचे चित्र आहे.