

Pune PMC Election 2025
sakal
PMC Election 2025: भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपाच्या वादामुळे युती तुटल्याने भाजपने १५८ ठिकाणी उमेदवार दिले असून, सात जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (रिपाइं) सोडण्यात आल्या आहेत. तिकीट वाटप करताना भाजपमध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवार बदलण्याची प्रक्रिया सुरू होती. यात अनेक दिग्गज्जांची उमेदवारी नाकारून त्यांना घरी बसविण्यात आले आहे. १६५ पैकी ९० जागांवर महिलांना, तर ७५ ठिकाणी पुरुष उमेदवारांना संधी दिली आहे.