

PMC Election 2025
sakal
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्हींतील अंतर्गत कलह उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी चव्हाट्यावर आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेवटच्या क्षणापर्यंत अन्य पक्षांतील उमेदवारांना प्रवेश देणे सुरू होते, त्याचवेळी त्यांना एबी फॉर्मही देण्यात आले, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठांच्या मागणीला डावलून त्यांचेही उमेदवार उपमुख्यमंत्री पवार यांनीच ठरविल्याचा आरोप करत ज्येष्ठ नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी धावपळ करत ६० ते ७० जणांना उमेदवारी अर्ज दिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १४० पेक्षा जास्त जणांना उमेदवारी अर्ज दिल्याचा दावा केला.