

Pune PMC Fine for Illegal Construction Debris Dumping
पुणे : सार्वजनिक रस्त्यावर बांधकामाचा राडारोडा टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला पुणे महापालिकेने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बुधवार पेठेतील तपकीर गल्ली परिसरात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने कारवाई केली.