

NCP Pune Politics
Sakal
पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये विरोधी पक्षनेता पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाकडून जुन्या जाणत्या, आक्रमक व अभ्यासू नगरसेवकाचा विरोधी पक्षनेता म्हणून विचार केला जात आहे. मात्र विरोधी पक्ष नेत्यासाठी आवश्यक आक्रमकता व अभ्यासूपणा हे दोन्ही गुण असणारे नगरसेवकांसाठी पक्षामध्ये खलबते सुरू आहेत. गुरुवारी, विरोधी पक्षनेत्याच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.