

PMC Initiates 'Smart Public Toilet' Project in Pune
Sakal
पुणे : पुणे महापालिकेकडून नागरिक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांत अत्याधुनिक सुविधा असलेली ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’ उभारण्याचे काम सुरू झाले असून, ही स्वच्छ, सुरक्षित आणि तंत्रज्ञानसंपन्न स्वच्छतागृहे नागरिकांना अधिक स्वच्छतेचा आणि सुसंस्कृततेचा अनुभव देणार आहेत. मार्च २०२६ पर्यंत पाच ‘स्मार्ट टॉयलेट’चे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर ती वापरासाठी खुली केली जाणार आहेत.