

Pune PMC TDR Rules | Commissioner Stops Paper Road Widening Proposal
sakal
पुणे : प्रत्यक्षात रस्ता विकसित न करताच कागदोपत्री रुंदीकरण दाखवून बांधकाम व्यावसायिकांना टीडीआर आणि प्रीमियम एफएसआयचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न काही माननीयांकडून होत आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २१० चा आधार घेत आणलेला वादग्रस्त रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवरून मागे घेतला. तसेच, यापुढे प्रत्यक्ष रस्ता विकसित होण्यापूर्वी अतिरिक्त एफएसआय आणि टीडीआरचे लाभ देता येणार नाहीत, असे स्पष्ट करणारे परिपत्रक काढले आहे.