
Pune's TDR Tangle Untangled: Commissioner Sets 90-Day Limit for Approvals.
Sakal
पुणे : पुणे महापालिकेतील हस्तांतरणीय विकास हक्क (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स - टीडीआर) प्रक्रिया पूर्ण होण्यास अनेक महिने लागत होता. पण आता ही कमी कागदपत्रांसह ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. ९० दिवसात टीडीआरची फाइल मंजूर करायची असे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले आहेत. एक नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.