
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पाणी साचणे आणि चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर प्रशासनाला जाग येण्याची वेळ आली आहे, पण यावेळी पुणे महापालिकेच्या मदत पुनर्वसन विभागाची गाडीच चिखलात अडकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.