Pune Municipal Electionsakal
पुणे
Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडे प्रारूप प्रभाग रचना सादर झाल्यानंतर यात बदल करण्यात आले. तीनचे तीन प्रभाग करणे नियमात बसत नाही, त्याऐवजी पाच सदस्यांचा एक प्रभाग केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.
Pune Latest News: पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज हा प्रभाग पाच सदस्यांचा करण्यात आला आहे. तीन सदस्यांचे तीन प्रभाग रद्द करून ते चार सदस्यांचे करण्यात आले आहेत. यामुळे लोहगाव पासून ते कात्रज पर्यंत १६ प्रभागांच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी मोठे बदल झाले. याचा परिणाम थेट ६४ नगरसेवकांवर होणार आहे. शिवसेनेच्या या चालीमुळे भाजपच्या मातब्बर नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

