पुणे : अखेर पीएमपी कर्मचाऱ्यांच्या बोनसला मान्यता

अखेर ऐन दिवाळीत का होईना पण बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
PMPML
PMPMLsakal

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहा हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना अखेर ऐन दिवाळीत का होईना पण बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. पीएमपीला देण्यात येणाऱ्या संचलन तुटीतील तरतुदीतून उलच देण्याचा निर्णय आज (बुधवारी) स्थायी समितीने घेतला. गेल्या आठवड्यात स्थायी समितीने पीएमपी कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी २४ कोटी रुपये द्यावेत असा ठराव केला होता.

महापालिकेकडून पीएमपीला मोफत व सवलतीच्या दराचे बस पासचे दरवर्षी पैसे दिले जातात. याच रकमेतून कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. पण गेल्या वर्षभरात कोरोनामुळे पीएमपी बस बंद असल्याने पासेसची रक्कम केवळ ३ कोटी ८ लाख रुपये इतकी झाली होती. त्यामुळे या रकमेतून कर्मचाऱ्यांना बोनस देता येणार नव्हता. उर्वरित २१ कोटी रुपये कोणत्या तरतुदीची उपलब्ध करायची यावरून संभ्रम निर्णय झाला, त्यामुळे गेले आठवडाभर या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही.

PMPML
दौंड : महिला पोलीस कर्मचा-याची देलवडीत आत्महत्या

त्यामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनस विना होती की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. यावरून पीएमपी कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांसह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना भेटून बोनस देण्याची मागणी केली.

अखेर आयुक्तांनी पाठविलेल्या अभिप्रायाचे अवलोकन करून बोनस देण्यासाठी आवश्यक असणारी २१ कोटी रुपयांची उचल देण्यास मान्यता देण्यात आली. ही रक्कम सेन २०२१-२२ च्या संचलन तुटीच्या तरतुदींमधून समायोजित करण्यात येणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

‘‘पीएमपी तोट्यात असल्याचे सांगून आयुक्तांनी बोनस देण्यास नकार दिला असता त्यांना २०१७ मध्ये औद्योगीक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखल देऊन बोनस दिला पाहिजे असे सांगितले. त्यानंतर आज आयुक्तांनी स्थायी समिती समोर निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे प्रत्येक कामगाराच्या खात्यावर १७ हजार रुपये जमा होणार असल्याने दिवाळीच्या पूर्वसंधेला कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.’’

- राजेंद्र खराडे, अध्यक्ष, पीएमटी कामगार संघ( इंटक)

PMPML
पुणे : दिवाळीत अन्नपदार्थामध्ये भेसळ, अन्न व औषध प्रशासनाचे छापे

बोनस जमा करण्यासाठी गडबड

स्थायी समितीच्या बैठकीत पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय होताच महापालिकेने २४ कोटी रुपये पीएमपीला आरटीजीएसद्वारे जमा केले. पुढील दोन दिवस बँकांना सुट्ट्या असल्याने आजच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी पीएमपी अधिकाऱ्यांची गडबड सुरू झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com