‘स्‍ट्रक्‍चरल प्‍लॅन’च्‍या हालचाली संथ

‘स्‍ट्रक्‍चरल प्‍लॅन’च्‍या हालचाली संथ
Published on

पिंपरी, ता. १४ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पायाभूत सुविधांसाठी संरचना आराखडा (स्ट्रक्चरल प्लॅन) कामासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्‍हणजे, यात इतर शासकीय विभागाचादेखील समावेश केला आहे. त्‍यासाठी बैठका झाल्‍या असून, त्‍यावर अद्याप ठोस कार्यवाही झाली नाही. प्रत्‍यक्षात ऑक्‍टोबर २०२६ पूर्वी हा आराखडा प्रसिद्ध करावयाचा होता. वेेळेत न झाल्‍याने पुन्‍हा तीन महिन्‍यांची मुदतवाढ दिली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड शहरात पुढील २० वर्षांच्‍या नियोजनासंबंधी सर्व शासकीय विभागांनी त्‍याबाबत माहिती कळवायची होती. त्‍यात जवळपास ३५ विभागांकडून माहिती येणे अनिवार्य आहे. त्‍यात मंजूर, विद्यमान आणि प्रस्तावित प्रकल्पांच्या माहितीचा नमूद करणे आवश्‍यक आहे. यात जिल्हा परिषद, महापालिका, पोलिस, एमआयडीसी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, महापारेषण, मेट्रो, पीएमपीएमएल प्रशासनाचादेखील माहितीचा समावेश असेल. या कामांना गती मिळावी, म्‍हणून प्रत्‍येक शासकीय विभागाने नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. सद्यःस्थितीमध्ये केवळ माहिती संकलन केले जात आहे.

काय आहे स्‍ट्रक्‍चर प्‍लॅन?
‘पीएमआरडीए’ने विकास कामासंबंधी विकास योजनांऐवजी महाराष्‍ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम अंतर्गत स्‍ट्रक्‍चरल प्‍लॅन तयार करण्‍याचे निश्चित केले. त्‍याबाबत ३० एप्रिल २०२६ रोजी त्‍याबाबत घोषणादेखील केली. या संदर्भात राज्‍य शासनाने नगररचना अधिकाऱ्याची नियुक्‍ती केली असून, पहिल्‍या टप्‍प्‍यात स्‍ट्रक्‍चरल प्‍लॅन, तर दुसऱ्या टप्‍प्‍यात सविस्तर आराखड्याचे नियोजन आहे. रस्‍ते, रेल्‍वे, जलमार्ग, वाहतूक, पायाभूत सुविधा घनकचरा, वीजेबाबत मांडणी असेल.

‘स्‍ट्रक्‍चरल प्‍लॅन’बाबत डेटा कलेक्‍शन व त्यासंबंधात काम सुरू आहे. हा आराखडा तयार करताना इतर शासकीय विभागाची माहितीदेखील त्‍यात समाविष्‍ट करावी लागते. त्‍यासाठीदेखील पाठपुरावा सुरू आहे.
- स्मिता कलकुटकी, उपसंचालक, नियोजन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com