esakal | पोलिसांची दंडात्मक कारवाई कोरोनावर ठरली गुणकारी
sakal

बोलून बातमी शोधा

Police

पोलिसांची दंडात्मक कारवाई कोरोनावर ठरली गुणकारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाला (Corona) अटकाव करण्यासाठी शहरात महापालिका प्रशासन, (Municipal Administrative) आरोग्य खात्याबरोबरच पोलिस (Police) प्रशासनाने रात्रंदिवस कंबर कसली. पोलिसांनी दंडात्मक कारवाईसह (Crime) राबविलेली प्रबोधनाची मात्रा या संसर्गाला लागू पडली. त्यामुळेच शहरातील रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली आहे. (Pune Police Action against Corona was Effective)

दुसऱ्या लाटेच्या प्रारंभीच शहरात कडक निर्बंध घालण्यात आले. अत्यावश्‍यक कारणाव्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केल्याने गर्दीवर नियंत्रणही आले. मात्र नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेचा गैरफायदा घेत नागरिकांची रस्त्यावरील गर्दी वाढली. अखेर पोलिसांनी पुन्हा एकदा रस्त्यावर दिसणाऱ्यांची चौकशी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.

Crime

Crime

एप्रिल महिन्यात आणि त्यापाठोपाठ एक ते पाच मे या कालावधीत दरदिवशी किमान एक हजार ते बाराशे जणांवर संचारबंदी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. सहा मेनंतर कारवाईने अधिक वेग घेतला. ६ मे रोजी ३४२९, १५ मे रोजी ५४९२ जणांवर कारवाई केली. त्यानंतर २३ मेपर्यंत ४ ते ५ हजार जणांवर कारवाई सुरू होती. परिणामी रस्त्यांवरील गर्दी कमी झाली.

नागरिकांच्या जिवाची व पोटाची काळजी घेऊन पोलिसांनी संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी केली. दंडात्मक कारवाईबरोबरच प्रबोधनावरही भर दिला. सुजाण पुणेकरांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत घराबाहेर पडण्याचे टाळले. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत झाली.

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

हेही वाचा: बारामतीतील कोरोना स्थितीबाबत मोठी बातमी

कोरोना संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी नागरिकांचे विनाकारण फिरणे बंद होणे गरजेचे होते. नागरिकांवर कारवाई करणे हा हेतू नव्हता, तरीही दंडात्मक कारवाईवर भर द्यावा लागला. कारवाईमुळे रस्त्यावरील गर्दीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले.

- डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलिस आयुक्त