Pune green police stations initiative

Pune green police stations initiative

sakal

Pune News : पुण्यातील सर्व पोलिस ठाणे होणार 'हरित', पोलिस आयुक्त अमितेश कुमार; ‘एम्प्रेस गार्डन’मध्ये पुष्पप्रदर्शनाचे उद्घाटन

Pune green police stations initiative : पुण्यातील सर्व पोलिस ठाणे ‘हरित पोलिस ठाणे’ होणार; एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन-२०२६ नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र.
Published on

पुणे/घोरपडी : निसर्गसंवर्धन ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. त्यासाठी शहरातील सर्व ४४ पोलिस ठाणे ‘हरित पोलिस ठाणे’ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली. ‘खाकीसेना’ आता ‘हरितसेने’च्या रूपात पर्यावरण रक्षणासाठी सक्रियपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘एम्प्रेस गार्डन’मध्ये यंदा आयोजित पुष्पप्रदर्शन-२०२६ चे उद्घाटन शुक्रवारी (ता. २३) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास प्रदर्शन समितीच्या उपाध्यक्षा सुमन किर्लोस्कर, मानद सचिव सुरेश पिंगळे, सहसचिव अनुपमा बर्वे, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आदी उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com