

Pune Bajaj Grand Tour
sakal
पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, २३ जानेवारी रोजी शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे.