

पुणे, ता. ५ : नऱ्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराच्या पाठीमागे गुन्हे शाखेने दोन सराईत गुन्हेगारांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, दोन मोबाइल आणि चोरीची दुचाकी असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुभम साधू चव्हाण (वय २०, रा. त्रियाग सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) आणि शुभम सतीश डोके (वय १९, रा. मेमाणे सोसायटी, नऱ्हे गाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे जण नऱ्हे पोलिस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक मंगळवारी (ता. ४) परिसरात गस्त घालत असताना पोलिस अंमलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला आणि योगेश झेंडे यांना खबऱ्याकडून आरोपींची माहिती मिळाली. आरोपी स्वामी नारायण मंदिराच्या भिंतीलगत अभिनव महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधारात थांबले असून, त्यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने घटनास्थळावरून तिघांना ताब्यात घेतले. आरोपींना नऱ्हे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.