Extortion Case : शिवम आंदेकरसह साथीदार खंडणीप्रकरणी अटकेत
Pune Police : गणेश पेठेतील मासळी बाजारात खंडणी वसूल केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार शिवम आंदेकर आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. खंडणी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांत अनेक जणांचा समावेश आहे.
पुणे : गणेश पेठेतील मासळी बाजारातील एका व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी आंदेकर टोळीतील सराईत गुन्हेगार शिवम आंदेकर याच्यासह त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली.