Pune Police : तब्बल 22 वर्षांपासून भारतात वास्तव्यास असणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

2000 मध्ये फाॅलरिन बिझनेस व्हिसावर नायजेरियातून भारतात आला होता.
Pune police arrested a Nigerian man for selling cocaine
Pune police arrested a Nigerian man for selling cocaine esakal
Summary

2000 मध्ये फाॅलरिन बिझनेस व्हिसावर नायजेरियातून भारतात आला होता.

पुणे : तब्बल 22 वर्षांपासून भारतात वास्तव्यास असणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला 'कोकेन' या अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली. या नायजेरियन व्यक्तीकडून 2 कोटी 20 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

पुणे शहर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं उंड्री भागातून त्याला अटक केलीय. फाॅलरिन अब्दुल अजीज अंडोई (वय 50) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune police arrested a Nigerian man for selling cocaine
Free Condom : नवीन वर्षात 25 वर्षांखालील लोकांना मिळणार मोफत कंडोम; 'या' देशाच्या राष्ट्रपतींचा महत्वपूर्ण निर्णय

'फाॅलरिन आहे रेकाॅर्डवरील गुन्हेगार'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाॅलरिन हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. एक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून कोकेन, इलेक्ट्राॅनिक काटे, कार, सहा मोबाईल असा एकूण 2 कोटी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 2019 मध्ये पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत कोकेन विक्री केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

Pune police arrested a Nigerian man for selling cocaine
Supreme Court : मुस्लिम मुलींच्या लग्नाबाबत सर्वोच्च न्यायालयानं धाडली केंद्राला नोटीस; चार आठवड्यांत मागितलं उत्तर

फाॅलरिन बिझनेस व्हिसावर नायजेरियातून आला भारतात

2000 मध्ये फाॅलरिन बिझनेस व्हिसावर नायजेरियातून भारतात आला. भारतीय कपडे नायजेरियात जाऊन विक्रीचा व्यवसाय तो करत होता. दरम्यान, 2014 मध्ये काेकेन तस्करीप्रकरणी कस्टम विभागानं त्याला अटक केली आणि गुन्हा दाखल केला. त्यामध्ये व्हिसा आणि पासपाेर्ट जप्त करण्यात आलं. तेव्हापासून तो भारतात लपून राहत होता. 2019 मध्ये पुन्हा फाॅलरिन कोकेन विक्री करताना पोलिसांच्या हाती लागला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com