

पुणे : धारदार हत्यारांनी दोघांवर जीवघेणा हल्ला करून वडगाव बुद्रूक परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीतील चौघांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. या कारवाईत एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.