Pune police e-cigarette raid
esakal
पुणे : शहरात प्रतिबंधित ई-सिगारेट (वेप) आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून आठ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.