Police Commemoration Day
Sakal
पुणे
Police Commemoration Day : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पुण्यात हुतात्म्यांना आदरांजली, उपमुख्यमंत्र्यांनी अर्पण केले पुष्पचक्र
Ajit Pawar : पुण्यातील पाषाण येथे २१ ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतीदिनानिमित्त शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले, ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हुतात्मा पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली.
पुणे : देशासाठी प्राणार्पण केलेल्या शूर पोलिस जवानांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी पाषाण येथे मंगळवारी (ता. २१) पोलिस स्मृतीदिनानिमित्त शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलिस स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबीय उपस्थित होते.

