esakal | आता गुन्हेगारांचं काही खरं नाही; पोलिस आयुक्तांनी केलाय मोठा निर्धार!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Police_Amitabh_Gupta

गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. खुनासारखे गंभीर वाढले असून गेल्या दहा दिवसांत तब्बल सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे आलेले आर्थिक संकट तसेच पूर्व वैमनस्यातून हे सर्व प्रकार होत आहेत.

आता गुन्हेगारांचं काही खरं नाही; पोलिस आयुक्तांनी केलाय मोठा निर्धार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीची गंभीर दखल घेतली आहे. कोणत्याही गुंड प्रवृत्तीला शांतता भंग करू देणार नाही, असे सांगत येत्या तीन महिन्यांत शहरातील गुन्हेगारी संपवू, असे आश्‍वासन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी (ता.७) पुणेकरांना दिले आहे.

पुणे : बांधकाम व्यावसायिक खून प्रकरणी पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या!​

गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. खुनासारखे गंभीर वाढले असून गेल्या दहा दिवसांत तब्बल सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे आलेले आर्थिक संकट तसेच पूर्व वैमनस्यातून हे सर्व प्रकार होत आहेत. त्या अनुषंगाने खासदार गिरीश बापट यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन अँटी गुंडा स्कॉड स्थापन करण्याची मागणी केली आहे.

पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच बांधकाम व्यावसायिकाचा सोमवारी खून झाला. यामुळे आयुक्तांवरील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दडपण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर, मागील दहा दिवसांत घडलेल्या सहा खुनाच्या गुन्ह्यांच्या तपासासंदर्भात पोलिस आयुक्तांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरातील गुन्हेगारी बद्दल भाष्य केले. या पत्रकार परिषदेस सह पोलिस आयुक्‍त रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्‍त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण उपस्थित होते.

प्रसिद्ध नृत्यांगणेनं २१ व्या वर्षी संपवलं जीवन; पुण्यात राहत्या घरी केली आत्महत्या​

गुन्हेगारांची यादी तयार :
लॉकडाऊन काळात 260 गुन्हेगार जामिनावर आणि पॅरोलवर सुटले आहेत. कारागृहाबाहेर आलेले आरोपी आणि गुन्हेगारांमुळे गुन्हेगारी वाढली, असे आपण ठोसपणे सांगू शकत नाही. गुन्हेगारांची यादी तयार आहे. त्यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे. गुन्हेगारांना पूर्वीपेक्षाही जादा जरब बसेल, अशी कारवाई केली जाईल. सहा खुनाच्या गुन्ह्यांपैकी पाच खुनाचे गुन्हे पोलिसांनी 24 तासात उघडकीस आणले आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले. 

कोणत्याही घटनांना आपण प्रतिबंध करू शकत नाही. मात्र, गुन्हे घडणार नाहीत याची पुरेशी काळजी घेत आहोत. घटना घडली तर तत्काळ कारवाई करत गुन्हेगारांना अटक करत आहोत. शहरातील गुन्हेगारी संपविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत पूर्णपणे वेगळे चित्र दिसणार आहे.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top