Pune News : पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी अमितेश कुमार; रितेश कुमार यांना महासंचालकपदी पदोन्नती

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने पोलिस महासंचालक पदावर बदली करण्यात आली आहे.
Pune Police Commissioner Amitesh Kumar
Pune Police Commissioner Amitesh Kumarsakal

पुणे - पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने पोलिस महासंचालक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रितेश कुमार यांच्याकडे होमगार्ड महासमादेशकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या गृह विभागाकडून बुधवारी रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. अमितेश कुमार १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

रितेश कुमार भारतीय पोलिस सेवेतील १९९२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी १६ डिसेंबर २०२२ रोजी पुण्याच्या पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.

शहरातील गुन्हेगारी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोका, एमपीडीए कायद्यान्वये गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला. शहरातील ११५ गुन्हेगारी टोळ्यांवर मोका कायद्यान्वये कारवाई केली.

तसेच १०० सराईत गुन्हेगारांना विविध कारागृहात स्थानबद्ध केले. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची प्रभावी कारवाई करणारे रितेश कुमार हे पहिलेच पोलिस आयुक्त आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील १७ जणांवर मोका कायद्यान्वये कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com