

Pune Police Commissioner Amitesh Kumar arrives at Pune District and Sessions Court following the firing and koyta attack incident. Security has been tightened across the court premises
esakal
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर न्यायालय परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना न्यायालयात बोलावण्यात आले आहे. पुणे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे या पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहेत. न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.