

पुणे पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुणे - पुणे पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तीन सहायक पोलिस आयुक्त आणि १३ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी जारी केले.
सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार यांची सिंहगड रोड विभागातून गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त (१) पदी बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांची विश्रामबाग विभागाच्या सहायक आयुक्तपदी तर, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांची प्रशासन विभागातून सिंहगड रोड विभागात बदली करण्यात आली आहे. पुढील आदेश होईपर्यंत गलांडे यांच्याकडे प्रशासन विभागाचाही पदभार राहणार आहे.
पोलिस निरीक्षक, पूर्वीचे ठिकाण पदस्थापना ठिकाण कंसात -
१. संतोष पाटील- बीड (बंडगार्डन पोलिस ठाणे, वरिष्ठ निरीक्षक)
२. भाऊसाहेब पठारे- नाशिक ग्रामीण (वानवडी पोलिस ठाणे, वरिष्ठ निरीक्षक)
३. चंद्रशेखर सावंत- गुन्हे अन्वेषण विभाग (पोलिस आयुक्त यांचे वाचक)
४. भरत जाधव- विशेष शाखा (गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभाग)
५. विजय कुंभार- सामाजिक सुरक्षा विभाग (भारती विद्यापीठ पोलिस ठाणे, वरिष्ठ निरीक्षक)
६. संतोष सोनवणे- वाहतूक शाखा (कोंढवा पोलिस ठाणे, वरिष्ठ निरीक्षक)
७. मनोहर इडेकर- विशेष शाखा (वाहतूक शाखा)
८. ब्रम्हानंद नाईकवाडी- नियुक्तीच्या प्रतीक्षेत (चतु:शृंगी पोलिस ठाणे, वरिष्ठ निरीक्षक)
९. संदीप भोसले- गुन्हे शाखा (भारती विद्यापीठ पोलिस ठाणे, पोलिस निरीक्षक, गुन्हे)
१०. सुनील जाधव- गुन्हे शाखा (वाहतूक शाखा)
११. प्रताप मानकर- वरिष्ठ निरीक्षक बंडगार्डन (गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक)
१२. श्रीहरी बहिरट- वरिष्ठ निरीक्षक भारती विद्यापीठ (गुन्हे शाखा युनिट ३)
१३. बालाजी पांढरे- वरिष्ठ निरीक्षक चतु:शृंगी (गुन्हे शाखा युनिट १)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.