Marijuana trafficking arrested in Pune
sakal
पुणे
Pune Crime News : गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पुण्यात गांजा तस्करीसाठी वापरलेली कारसह मुद्देमाल जप्त
Marijuana trafficking arrested in Pune : गुन्हे शाखा युनिट ५ पथकाने हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा व तस्करीसाठी वापरलेली ओरा कार जप्त केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, १४ लाख ८३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सुनील जगताप
उरुळी कांचन : गुन्हे शाखा युनिट ५ पथकाने हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सराईत आरोपींकडुन ३४ किलो ४४० ग्रॅम वजनाचा गांजा व गांजा तस्करी करण्यासाठी वापरलेली ओरा कार हस्तगत करून एकुण १४ लाख ८३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३१,रा.बिल्डींग नंबर ११ फ्लॅट नंबर १०७,नविन म्हाडा कॉलनी,सुरक्षानगर,हडपसर,पुणे) व विशाल दत्तात्रय जाधव,वय २८,रा.वाडकर यांचे रुममध्ये भाडयाने ओढयाचे जवळ,हिंगणे मळा, हडपसर,पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

