

Nilesh Ghaywal
ESakal
पुणे - कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात बनावट पारपत्राच्या आधारे पसार झालेला गुंड नीलेश घायवळ याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे. नीलेश घायवळला ताब्यात घेण्यासाठी यापूर्वी रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस देखील बजावली आहे.