पुणे पोलिस पडले प्रेमात, पाहा कोण आहे Valentine?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

पुणे पोलिस देखील  Valentine Week साजरा करताना दिसत आहेत. पुणे पोलिसांनी Rose Day, Chocolate Day, Fridenship Day,Teddy Day साजरा करुन पुणेकरांवर असलेले प्रेम व्यक्त करत आहेत. हे Valentine Week साजरा करातानाही पुणे पोलिस वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश द्यायला विसरत  नाही

पुणे : सध्या Valentine Week सुरु आहे त्यामुळे सगळीकडेच तरुणाई Rose Day, Chocolate Day, Fridenship Day ,Teddy Day साजरा करताना दिसत आहे. गुलाब, टेडी बेअर, चॉकलेट सारख्या वस्तूंनी बाजार पेठा- दुकाने खुलली आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला काहीतरी गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करण्यासाठी हे दिवस साजरा केले जातात. पण या Valentine Weekची भूरळ पुणे पोलिसांना देखील पडली आहे. 

पुणे पोलिस देखील  Valentine Week साजरा करताना दिसत आहेत. पुणे पोलिसांनी Valentine Day,  Rose Day, Chocolate Day, Fridenship Day,Teddy Day साजरा करुन पुणेकरांवर असलेले प्रेम व्यक्त करत आहेत. हे Valentine Week साजरा करातानाही पुणे पोलिस वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश द्यायला विसरत  नाही.

वाहतूकीच्या नियमांचे अचूक आणि काटेकोर पालन करणाऱ्या पुणेकरांना कधी गुलाब देऊन तर, कधी टेडी बेअर ऐवजी हेल्मेट देऊन व्यक्त करत आहेत. पुणे पोलिस, पुणेकरांनो, तुम्ही ''वायफाय आहात का? कारण आम्हाला तुमच्याशी फार स्ट्रॉंग कनेक्शन जाणवतं!'' असे ट्विट करुन  पुणेकरांबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत, पण त्याचबरोबर पुणेकरांना सतर्क राहण्यास देखील सांगत आहेत.

''टेडी बेअर क्युट असतात! त्यात काही वादच नाही. पण अनोळखी , असुरक्षितच नाही तर धोकादायक असू शकतात. आपल्याला कुठेही असे काही आढळल्यास आम्हाला कळवा.'' असा संदेशही पुणे पोलिसांनी टेडी डे निमित्त पुणेकरांना दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police fell in love, see who is Valentine